Surprise Me!

एकनाथाच्या राज्यात शेतकरी 'अनाथ', Raju Shetti यांनी मुख्यमंत्र्यांना सुनावलं | Eknath Shinde

2023-04-10 1,164 Dailymotion

राज्यात तिसऱ्यांदा अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे शेतकऱ्यांची अवस्था आगीतून फुफाट्यात अशी झाली आहे. या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी खडे बोल सुनावले आहेत. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाल्याचे राजू शेट्टी म्हणाले. राजू शेट्टी म्हणाले की, राज्यात बेमोसमी अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे राज्यात कांदा द्राक्ष, भोपळा, भाजीपाला, पेरु यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तळहातावरच्या फोडाप्रमाणे शेतकरी आपलं पीक जपत असतो, पण निसर्गाच्या फटक्याने होत्याचं नव्हतं होते. एकनाथाच्या राज्यात शेतकरी अनाथ झाला आहे. मुख्यमंत्रीसाहेब प्रभू रामचंद्राचे दर्शन घ्यायचं असेल, तर खुशाल घ्या. ती तुमची व्यक्तिगत बाब आहे. मात्र, राज्य प्रमुखाला व्यक्तिगत बाबींपेक्षा कर्तव्य श्रेष्ठ असतात आणि कर्तव्याकडे लक्ष देणं गरजेचं असतं.

#RajuShetti #SwabhimaniShetkari #EknathShinde #SharadPawar #BMCHospitals #Coronavirus #UnseasonalRain #MaharashtraGovernment #PMNarendraModi #DeepakKesarkar #Coronavirus #NCP #Shivsena #BJP #MaskCompulsory #BMC #Covid19 #AbuAzmi #Mumbai